
‘अॅन अनसुटेबल बाॅय’ या त्याच्या आत्मचरित्रात त्यानं काजोल आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगितलंय.तो म्हणतोय, ‘आमची मैत्री तुटली.आता ती माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही.एक काळ होता की ती माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होती.’
दोघांची मैत्री तुटल्याची आतापर्यंत चर्चा होती. पण करणनं या आत्मचरित्रातून त्यावर शिक्कामोर्तब केलं.त्यांची मैत्री तुटायला अजय देवगण कारणीभूत असल्याची चर्चाही बाॅलिवूडमध्ये आहे.
अजय देवगणचा ‘शिवाय’ आणि करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ एकाच दिवशी रिलीज झाला होता. त्यावेळी अजयनं करणवर पैसे देऊन तो अजयची इमेज खराब करतोय, हा आरोप केला होता.
No comments:
Post a Comment